Ad will apear here
Next
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले यांची निवड
कराड (सातारा) : श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि कराड येथील कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले  यांची निवड झाली आहे. राज्य सरकारने ही निवड जाहीर केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल कराड, मलकापूर भागातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. डॉ. अतुल भोसले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. 

लहानपणापासूनच त्यांना घरात सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा लाभला असून, सहकारमहर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांचे ते नातू आहेत. अतुल भोसले यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे निष्णात सर्जन म्हणून, ख्यातकीर्त असून सहकार, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील संयमी नेतृत्व म्हणूनही त्यांना ओळखले जाते.

२०१४मध्ये त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री आमदार विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक लढवून, तब्बल ५८ हजार मते मिळविली होती. डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कराड नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः सातारा जिल्ह्यात भाजपचा चेहरा म्हणून डॉ. अतुल भोसले यांना ओळखले जाते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZUIBE
Similar Posts
वारकरी हा केंद्रबिंदू मानून कार्य करणार : डॉ. अतुल भोसले कराड (सातारा) : ‘माझ्या हातून वारकऱ्यांची सेवा घडावी ही परमेश्वराचीच इच्छा असल्याने, मला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी कार्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात वारकरी हाच केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि वारकऱ्यांना अधिकाधिक सेवासुविधा पुरविण्यासाठी
सदाभाऊ खोत घेणार कराड दक्षिण मतदारसंघ दत्तक कराड (सातारा) : ‘कराड दक्षिण मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, पुलांचे बांधकाम अशा विकासकामांसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले सातत्याने पाठपुरावा करत असतात. त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी आणि या भागाला भरघोस निधी मिळून येथील विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी मी कराड दक्षिण
कृष्णा सहकारी साखर कारखान्यात मिल रोलरचे पूजन शिवनगर (ता. कराड, जि. सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात २०१७-१८ गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी
‘कार्वेच्या विकासासाठी ४६ लाखांचा निधी’ कराड : कार्वे गावाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन विकास आराखड्यातून ४६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर कार्वे येथील धानाई आडवाट रस्ता, गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नवीन अंगणवाडी आणि धानाई देवस्थानाचा ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकास, अशी विकासकामे येत्या काळात करण्यात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language